श्री.म्हसोबा जीर्णोद्धार सोहळा व नर्मदेश्वर महादेव शिवालयाची स्थापना उत्साहात संपन्न....

Ahmednagar Breaking News
0

श्री.म्हसोबा जीर्णोद्धार सोहळा व नर्मदेश्वर महादेव शिवालयाची स्थापना उत्साहात संपन्न....


नगर, प्रतिनिधी.(05.सप्टेंबर.2024) : नगर शहरातील जुन्या कोर्टाच्या जवळ असलेल्या टांगे गल्ली परिसरात श्री.म्हसोबा जीर्णोद्धार सोहळा व नर्मदेश्वर महादेव शिवालयाची स्थापना उत्साहात संपन्न झाली. बुधवार 04 सप्टेंबर रोजी सकाळी परिसरातून शोभा यात्रा काढण्यात आली, यावेळी परिसरातील नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच सायंकाळी भजन गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला याचा भाविकांनी आनंद घेतला.

गुरुवार 05 सप्टेंबर सकाळी 06:00 वाजता श्री.म्हसोबा महाराजांची पुनर्स्थापना आणि नर्मदेश्वर महादेवाचे महाभिषेक, विधिवत पूर्ण पूजा करण्यात आली. या पूजेचे मानकरी श्री. व सौ.योगेश दुर्गे हे होते.

संध्याकाळी 07:00 वाजल्यापासून महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. यावेळी परिसरासह नगर शहरातील विविध भागातून नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top