ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार व बातमीदार दत्ता इंगळे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
1 minute read
0

ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार व बातमीदार दत्ता इंगळे यांचे दुःखद निधन.

नगर,प्रतिनिधी.(07.सप्टेंबर.2024.) : नगर शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार व बातमीदार दत्ता इंगळे (57 वर्ष ) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.काही दिवसांपासून ते आजारी असल्याने पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज शनिवार 07 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुळगाव चिचोंडी पाटील असलेले दत्ता इंगळे यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून नगर येथे येऊन प्रथम त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम सुरू केले होते. नगर शहरात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून छायाचित्रकार क्षेत्रात योगदान देऊन नावलौकिक मिळवला होता. त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील देखील विविध पुरस्कार मिळाले होते.

To Top