समाजाचे देणे लागतो या भावनेतून फिनिक्सचे कार्य.- सविताताई पानमळकर.

Ahmednagar Breaking News
0

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनचा उपक्रमात 45 महिलांचा स्वयंस्फुर्तीने नेत्रदान संकल्प.

नगर,प्रतिनिधी.(10. मार्च.) : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या त्यागातूनच आजच्या महिलांना प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे आज त्या राष्ट्रपती पदापर्यंत कार्य करत आहेत. समाजोन्नत्तीच्या कामात राष्ट्रपुरुषांचे योगदान हे नेहमीच आपणास प्रेरणादायी राहिले आहे. तिच प्रेरणा घेऊन फिनिक्स फौंडेशन सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करत आहे. अशा मोफत शिबीराच्या माध्यमातून महाग होत चाललेल्या आरोग्य सेवा ही गरजूंना मोठा आधार वाटत आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी हे ब्रीद वाक्य खर्या अर्थांना प्रत्यक्षात आणण्याचे काम जालिंदर बोरुडे करत आहे. त्यांच्या कार्यात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच सविताताई पानमळकर यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने  नागरदेवळे येथे आयोजत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन माजी सरपंच सविताताई पानमळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उद्योजक अण्णा दिघे, यशवंत सावंत, फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राजेंद्र बोरुडे, गोरक्ष राऊत आदि उपस्थित होते. 

यावेळी नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये सुमारे 45 महिलांनी स्वयंस्फुर्तीने नेत्रदान संकल्प करुन संकल्पपत्रे भरुन दिली. 

प्रास्तविकात अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून आरोग्य सेवेचा हा अखंड यज्ञ सुरु आहे. सर्वसामान्य, गरजूंना मोफत शिबीराच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी फिनिक्स फौडेशनच्या माध्यमातून काम सुरु आहे. गरजूंची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया द्वारे नवी दृष्टी देण्याचा आमच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे समाधान आहे. राष्ट्र पुरुषांचे विचार हे कृतीतून आचरणात आण्याचा प्रयत्न जयंती-पुण्यतिथीनिमित्त केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबीरात बुधराणी हॉस्पिटलच्यावतीने माया आल्हाट, प्रशांत पाटील, अमित पिल्ले यांनी रुग्णांची तपासणी केले. या शिबीराचा 283 रुग्णांची लाभ घेतला तर 67 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे बुधराणा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. यावेळी आवश्यक रुग्णांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले तर आभार गोरक्ष राऊत यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top