अवैद्य गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापा टाकून दोन आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

अवैद्य गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापा टाकून दोन आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

अहमदनगर, प्रतिनिधी.(२५ नोव्हेंबर) : राहुरी पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन ०२ आरोपी विरुध्द कारवाई करुन ८०,०००/- रुपये (ऐंशी हजार रु.) किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने १,४०० लि.कच्चे रसायन व १०० लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे.

           श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/मनोहर शेजवळ,बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी,राहुल सोळंके,पोको/रोहित येमुल, आकाश काळे व सागर ससाणे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.२४/११/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०२ ठिकाणी छापे टाकुन एकुण ८०,०००/रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे १,४०० लि.कच्चे रसायन,१०० लि.गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ०२ आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top