विचार भारती आयोजित ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला.

Ahmednagar Breaking News
0

विचार भारती आयोजित ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन महंत भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते.

नगर,प्रतिनिधी. (22. मे.) : विचार भारती आयोजित ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला 24 मे 2023 ते 28 मे 2023 रोजी सायं.05:30 वाजता माऊली सभागृह,सावेडी रोड,अहमदनगर येथे संपन्न होत असून महंत भास्करगिरी महाराज (श्री.क्षेत्र देवगड संस्थान) हे कार्यक्रमाचे उद्घाटक व आशिर्वचन आहेत.

                   कार्यक्रमाची रूपरेषा:

बुधवार दि. 24 मे 2023 रोजी महाभारत फेम प्रसिद्ध सिने अभिनेता श्री.नितीश भारद्वाज यांचा सिनेसृष्टी -भारतीय दृष्टी या विषयावर संवाद होईल.

गुरुवार दि 25 मे 2023 रोजी अखिल भारतीय संघटन मंत्री, वनवासी कल्याण आश्रम श्री.अतुल जोग यांचा जनजाती क्षेत्राची प्रतिमा आणि वास्तव या विषयावर संवाद होईल.

शुक्रवार दि 26 मे 2023 रोजी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज व अध्यक्ष श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ श्री. रघुजीराजे आंग्रे यांचा छत्रपतींची आरमार उभारणी : हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान या विषयावर संवाद होईल.

शनिवार दि 27 मे 2023 रोजी प्रांत उपाध्यक्ष,संस्कार भारती, पश्चिम प्रांत श्री अभय भंडारी यांचा पसायदान : विश्व कल्याणाचा महामंत्र या विषयावर संवाद होईल.

रविवार दि 28 मे 2023 रोजी इतिहास संशोधक व प्रसिद्ध वक्ते श्री.मोहन शेटे यांचा वासुदेव बळवंत फडके ते नेताजी सुभाष चंद्र बोस : मृत्युंजयाचा आत्मज्ञान या विषयावर संवाद होईल.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन विचार भारती अहमदनगर शाखेकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top