राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगरमध्ये.

Ahmednagar Breaking News
0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अहमदनगर शहरात मेळाव्याचे आयोजन.

नगर,प्रतिनिधी. (26.मे.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अहमदनगर शहरात 9 जून रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा अहमदनगर शहरात होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज अहमदनगर शहरात जागेची पाहणी करण्यासाठी आले होते.यावेळी आ.संग्राम जगताप,आ.प्राजक्त तनपुरे,घनश्याम शेलार,राजेंद्र फाळके, माणिकराव विधाते,अजिंक्य बोरकर,अविनाश घुले,महेश बुचडे,केतन क्षीरसागर,सुरेश बनसोडे, सुमित कुलकर्णी,गजेंद्र भांडवलकर,विशाल म्हस्के,सोमनाथ हारेर,संतोष ढाकणे,संतोष हारेर,आतिष हारेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले कि,काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली, या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापन दिन अहमदनगर शहरामध्ये साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले.हा एक आनंदाचा क्षण असून आज नगरला एक मोठी संधी मिळाली आहे आणि यातून नगरचे नाव लौकिक हे महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये जाण्याकरिता याचा उपयोग निश्चित यामधून होणार आहे. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारी एक चांगली दिशा या मेळाव्यात ठरणार आहे. तसेच या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून बदलत्या महाराष्ट्राचं जे पाऊल पडणार आहे त्याची सुरुवात आपल्या नगर मधून होणार असल्याने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top