पोलीस हवालदार रवींद्र पांडे यांना मा.पोलीस महासंचालक मुंबई यांचेकडून पोलीस मेडल व प्रमाणपत्र प्राप्त....
नगर, प्रतिनिधी. (05. मे.2024.) : पोलीस हवालदार रविंद्र सुरेश पांडे हे दिनांक.11/01/1994 साली अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर कार्यरत असतांना त्यांनी दारुबंदी, जुगार कायदा केसेस करुन प्रतिबंध केला. तसेच दरोडा, जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा तसेच चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपींना अटक करण्यात मदत केली.
तसेच त्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं. 08/2001 भादवि कलम 395,376(ग) वगैरे या कोठेवाडी,ता.पाथर्डी येथील गंभीर स्वरुपाच्या व बहुचर्चित गुन्ह्यातील आरोपी अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्यात मदत केली. सदर प्रकरणी मा.न्यायालयाने यातील आरोपीत यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सदरबाबत त्यांना चांगली कामगीरी केले बाबत मा.पोलीस अधिक्षक साहेब अहमदनगर यांनी बक्षिस दिले आहे.
तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे कार्यरत असतांना त्यांना उत्तम कामगीरी बद्यल 121 बक्षिसे दिलेली आहेत. तसेच मा. पोलीस महासंचालक साो, अँन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कडुन उत्कृष्ट कामगरी बद्यल विशेष बक्षिस म्हणुन 10000/- रुपये रोख प्रदाण करण्यात आलेले आहे.
त्यानंतर त्यांची बदली उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर येथे झाली तेथे त्यांनी बहुचर्चीत हिंम्मत जाधव खुन प्रकरणातील आरोपींना अटक करणेकामी योग्य ती मदत करुन त्यांच्या विरुध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करणेकामी योग्य ती मदत केलेली असुन सदर प्रकरणी मा.न्यायालयाने आरोपीत यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
तसेच वसंतराव नाईक महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपींना अटक करणेकामी योग्य ती मदत करुन त्यांच्या विरुध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करणेकामी योग्य ती मदत केलेली असुन सदर प्रकरणी मा.न्यायालयाने आरोपीत यांना शिक्षा ठोठावली आहे.
बहुचर्चीत पांगरमल बनावट दारु प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांचे विरुध्द दाखल गुन्हयाचा तपास करुन मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात मदत केली म्हणुन मा.पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांनी रोख बक्षीस दिलेले आहे.
त्याच प्रमाणे बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांड या महाराष्ट्रात गाजलेल्या प्रकरणामध्ये अतिशय उल्लेखनिय, गुणवता पुर्व व महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशी कामगीरी केली आहे.
तसेच पारनेर पोस्टे गुरनं. 100/2018 भादवि कलम 307 वगैरे अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करणेकामी योग्य ती मदत करुन त्यांच्या विरुध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करणेकामी योग्य ती मदत केलेली आहे. सदर प्रकरणी मा.न्यायालयाने यातील आरोपीत यांना शिक्षा ठोठावली आहे.
तसेच पारनेर पोस्टे गुरनं.249/2016 भादवि कलम 376, पोक्सो वगैरे अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीस अटक करणेकामी योग्य ती मदत करुन त्यांच्या विरुध्द मा.न्यायालयात दोषारोप पत्र सादर करणेकामी योग्य ती मदत केलेली आहे. सदर प्रकरणी मा.न्यायालयाने यातील आरोपीत यांना शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी उप विभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांचे लेखणीक म्हणुन कामकाज करत असतांना उप विभागीय पोलीस अधीकारी यांच्याकडे तपासकामी असलेले अनुसुचीत जाती जामाती कायदयान्वये दाखल गुन्हे, खुन व दरोडयासह मोक्क्या सारख्या गंभीर गुन्हयाचे 05 तपासात मदत करुन मा.अपर पोलीस महासंचालक साो, (का.व.सु.) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची पुर्व परवानगी घेवुन आरोपींविरुध्द मा.न्यायलायात दोषारोपपत्र सादर केलेले आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या टोळयांना नियंत्रीत आणणे कामी योग्य ती मदत केलेली आहे.
आज पावेतो श्री. रविंद्र सुरेश पांडे यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या सेवा कालावधी मध्ये शासकिय कर्तव्याच्या कालावधीत प्रामाणीक व चोक कर्तव्य बजावल्याने त्यांना वरिष्ठांनी पुर्ण सेवा कालावधी मध्ये सुमारे 195 रोख स्वरुपाची बक्षिसे दिलेली आहेत. त्यांनी आज पर्यंत अतिक्षय उल्लेखनिय, गुणवता पुर्व व महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशी कामगीरी केली आहे. त्यामुळे नमुद पोलीस अंमलदार यांचा संपुर्ण सेवा अभिलेख पाहता तो निश्चितच वाखानन्या जोगा, अति उकृष्ट व कौतुकास्पद आहे.
श्री.रविंद्र सुरेश पांडे यांनी सन 2013 साली शासनामार्फत झालेल्या विभागीय अर्हता पोलीस उप निरीक्षक परिक्षा 300 पैकी 214 गुण मिळवुन उर्तीण झालेले आहेत. यावरुन त्यांचा सेवा अभिलेख निश्चितच अति उकृष्ट आहे.