नगर शहरात प्रथमच 3001 महासामुदायिक शंकर गीता पारायण सोहळा.

Ahmednagar Breaking News
0
नगर शहरात प्रथमच 3001 महासामुदायिक शंकर गीता पारायण सोहळा.

नगर, प्रतिनिधी. (02.ऑगस्ट. 2024.) : नगर शहरात प्रथमच श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ,शिवाजीनगर,केडगाव, अहमदनगर आयोजित तीन सहस्त्र (3001) महासामुदायिक शंकरगीता पारायण सोहळा रविवार, 04 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 11:00 ते 03:00 वाजता निशा लॉन, श्रीराम कॉलनी, नगर पुणे रोड, येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गुरुवर्य विकासदादा पाटील,श्री.स्वामी सेवा प्रतिष्ठान,घोडबंदर मठ,ठाणे आणि गुरुवर्य विजु दादा कडलासकर, संतवर्य समर्थ सद्गुरु योगीराणा ज्ञानसागर शंकर महाराज ध्यान मंदिर,सोलापूर हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
पारायणासाठी येताना भाविकांनी सोबत बसकर (आसन), शंकर गीता, श्रीफळ, (हार - फुले, प्रसाद स्वइच्छेने )घेऊन यावे. ज्या भाविकांकडे शंकर गीता नसेल त्यांना मठामार्फत पारायणासाठी शंकर गीता उपलब्ध करून देण्यात येईल.दुपारी 03:00 ते 04:00 श्रींचा पालखी सोहळा व आरती करण्यात येईल, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
                           आयोजक.
श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज सेवा. मंडळ.केडगाव,अ.नगर.
 जय भवानी शंकर मठ.गोपाळवाडी,दौंड.
सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ. तासवडे, एमआयडीसी, कराड.
 सद्गुरु शंकर महाराज ज्ञानमृत मठ,कर्जत.
 सद्गुरु शंकर महाराज उद्भवपीठ,चिंबळे.
 सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ,नाशिक.
 श्री सद्गुरू शंकर महाराज आदिशंकर मठ, शिरूर, पुणे.
 शंकर महाराज मंदिर,स्वामी मठ,तिल कवाडा,गुजरात.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top