पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे यांचे दुःखद निधन....
नगर, प्रतिनिधी. (17.सप्टेंबर. 2024) : कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेले ज्ञानेश्वर मोरे यांचे सोमवारी संध्याकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते त्यावेळी कर्तव्यावर हजर होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज कोतवाली पोलीस ठाण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व पोलीस बांधव आनंदी आणि भक्तिमय वातावरणात सामील झाले होते.यावेळी मोरे देखील सामील झाले होते.त्यांनी मित्र परिवारांसोबत डान्स केला होता आणि त्यानंतर ते दैनंदिन कामकाज करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
अंतयात्रा मंगळवार दि 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून निघेल आणि अंत्यविधी भिंगार येथील श्री शुक्लेश्वर अमरधाम येथे होईल.