विळद बायपास ते डीएसपी चौक रस्त्यासाठी 60 कोटी मंजूर. - खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी.(14. जून.) : अहमदनगर जिल्ह्यात सध्या रस्ता दुरुस्ती तसेच महामार्ग चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर होत असून विळद बायपास ते डीएसपी चौक या 12.130 किलोमिटर मार्गासाठी एकूण 60 कोटी रुपयाची मान्यता देण्यात आले असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिनांक 13 जूनला या संबंधीचे मंजुरीचे पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगून या रस्त्यास 2020-21 यावर्षी मान्यता देण्यात आली मात्र कोपरगाव - शिर्डी - अहमदनगर - विळद बायपास हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने विळद बायपास ते डीएसपी चौक हा रस्ता प्रलंबित राहिला. या मार्गावरून अहमदनगर महानगरपालिका, एमआयडीसी तसेच शिर्डी कडे जाणारी वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर आहे. विळद बायपास ते डीएसपी चौक हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे ह्या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. राज्य शासना कडे या करिता महसूल , पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला असल्याचे विखे यांनी सांगताना केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यासाठी बांधकाम विभागाने एकूण 60 कोटी रुपये मंजूर करून यात 47कोटी हे रस्त्यासाठी तर उर्वरित जीएसटी आणि इतर बाबीसाठी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. आता लवकरच या मार्गाचे काम सुरू होईल असे विखे यांनी सांगितले.