महावितरण सावेडी कक्षातर्फे सावेडी भागातील गणेश मंडळांना जाहीर आवाहन.....
नगर, प्रतिनिधी.(06.सप्टेंबर.2024.) : महावितरण सावेडी कक्षातर्फे सावेडी भागात असलेल्या गणेश मंडळांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे कि,प्रत्येक गणेश मंडळांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन करून घ्यावे. या कामासाठी महावितरणचे सावेडी कक्ष नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटबद्ध असल्याचे सावेडी कक्षाचे सहाय्यक अभियंता जगन्नाथ बारगळ यांनी ABN शी बोलताना सांगितले.तसेच जे कोणी मंडळ अनधिकृत वीज जोडणी करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.